- अमीन सयानी प्रस्तुत - गीतमाला (1-1) : Saturday,May 25, 2013, 11AM & 10 PM [ EST]
- विशेष कार्यक्रम :चाणक्य मंडळ चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान " बलसागर भारत होवो "
Saturday ,May 26, 2013, 4 PM [ EST], on Marathi Radio - विशेष कार्यक्रम :" मुलाखती का उचापती ? " महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध,तरुण पिढीतील दमदार गायक व संगीतकार : समीर रवी दाते व दीपाली सोमय्या यांची अनौपचारिक मनमोकळी मुलाखत Saturday,May 25, 2013, 4:00 PM.
- स्वरांजली : सादर करीत आहेत Sanjeev Ramabhadran : Sunday, May 26, 2013, 4:00 PM [ EST]
पुरण पोळी
पुरणाचे साहित्य :
३ वाट्या हरभरा डाळ, २ वाट्या चिरलेला गूळ, १ वाटी साखर, पाव टी-स्पून जायफळाची पूड, पाव टी- स्पून वेलदोड्याची पूड, पाव टी - स्पून मीठ, ७/८ वाट्या पाणी पुरण शिजण्या करता. साधारण १० वाट्या पाणी जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर.
कणकेचे साहित्य :
१/२ वाट्या चाळलेली कणिक, १/२ वाट्या मैदा , पाव टी - स्पून मीठ, ३ चमचे तेल, १ वाटी तांदळाची पिठी
कृती :
स्वच्छ धुतलेली हरभरा डाळ एका जड बुडाच्या पातेल्यात ७ ते १० वाट्या पाण्यात शिजवायला ठेवा. हि डाळ साधारण अर्ध्या तासात बोटचेपी शिजेल. मधल्या वेळेत पोळीला लागणारी कणिक भिजून घ्या. हि कणिक चागली तिंबून व माळून घेणे गरजेचे आहे. मग टी थोड्या तेलात भिजत ठेवा. डाळ चांगली शिजली कि त्यातील पाणी एका पातेल्यात चाळणीतून तोतून घ्या. मग हि डाळ परत त्याच जड बुडाच्या पातेल्यात घेऊन नीट ठेचून व रगडून मऊ करून घ्या आणि मग त्यात साखर आणि गूळ एकत्र करून घाला आणि आता परत हे मिश्रण gas वर ठेवा आणि परत शिजवून घ्या. पुरण चागले शिजल्याची खून म्हणजे ते घट्ट होऊ लागेल, खमंग वास येईल आणि पातेल्याची कड वळलेली दिसेल. हलवायला घेतलेला चमचा वा उलथन पातेल्यात उभे केले तर ते उभे राहिल. शिजले पुरण पुराण्यान्त्रातुन किवा blender मधून वाटून घ्या.
पोळी अशी करावी :
३ भाग पुरणाचा गोळा आणि १ भाग कणिक घेऊन ते पुरण कणकेच्या परी मध्ये बटाट्याच्या पराथ्याप्रमाणे भरून अगदी हलक्या हाताने हि पोळी तांदळाच्या पितीवर कडा पात्तळ होईस्तोवर लाटावी. मग तूप वा तेलाचा हात लावून ठी मध्यम आचेवर ठेवलेल्या तव्यात टाकावी. तवा जास्ती तापलेला नसावा. हि पोळी तव्यात दोनदाच उलटावी.
गरम गरम तूप बरोबर, दुध बरोबर वा कटाच्या अमातीबरोबर हि पोळी वाढायची पद्धत आहे.
या साहित्यात साधारण १०/१२ माणसांच्या पोळ्या होतील.
कटाची आमटी :
कट काढलेले पातेली तसेच gas वर तेवा. त्यात भाजलेल्या खोबर्याची पूड, गोड मसाला, चवीपुरते मीठ, पुरणाचा गोळा आणि आणखी थोडा गूळ, चमचाभर चिंचेचा कोळ वा २/३ चिंचेची बुटुक.
हे सर्व घालून हि आमटी उकळायला ठेवा आणि वरून जीरे-मोहरीची, हिंग आणि कधीपला घालून चरचरीत फोडणी द्या. बारीक चिरलेली कोथिंबीर मात्र विसरू नका.
वदनी कवळ घेता, नाम घ्या श्री हरीचे !
- अर्चना जोशी
- nitu's blog
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.

